Chetan Bodke
मराठमोळा टीव्ही अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुखदाने गुलाबी रंगाची पैठणी परिधान केली आहे.
अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे तर, तिने गुलाबी साडीला मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
गुलाबी रंगाच्या पैठणीवर सुखदाने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
“Paithani… Everlasting… Evergreen… Never-ending ‘मोह मोह के धागे’!” असे सुखदाने त्या फोटोशूटला कॅप्शन दिले.
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर सुखदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करीत आहे.
अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटोज् शेअर करते.