Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये प्राजक्ताने ‘महाराणी येसुबाई’ यांचे पात्र साकारले होते. मालिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
कोणताही आऊटफिट असो अगदी व्यवस्थित रित्या सर्वच लूकमध्ये प्राजक्ता सुंदर फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करते.
प्राजक्ताने ब्लॅक कलरचा बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये खूप खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न ड्रेसवर खूप सुंदर फोटोशूट केले असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.
अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला असून मोकळे केस सोडत लूक साजेशी फॅशन तिने केलेली दिसत आहे.
प्राजक्ताचे हे नवे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करीत आहे.
प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.