Chetan Bodke
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या नारकर
ऐश्वर्या नारकर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे तर कधी आपल्या फोटोंमुळे चर्चेत असतात.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पारंपारिक साडी परिधान करीत खूप सुंदर लूक केलेला दिसतोय.
सोनेरी काठ असलेली साडी, मल्टिकलर ब्लाऊज परिधान करत ऐश्वर्या यांनी आपला लूक पूर्ण केला आहे.
लूकला साजेसे मराठमोळे दागिने, कानामध्ये झुमके आणि न्यूड मेकअप असा संपूर्ण लूक केला आहे.
ऐश्वर्या यांच्या ह्या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नसून त्यांच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे ऐश्वर्या नारकर चर्चेत असतात.
ऐश्वर्या फक्त मालिकेतूनच नाही तर नाटक आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे कायमच मनोरंजन करतात.