Dhanshri Shintre
उन्हाळा आला की आंब्याच्या चविष्ट पदार्थांची आठवण आपोआप येते. आमरस, लाडू, मोदक, बर्फी घराघरात दरवळत असतात आणि हवेसारखे वाटतात.
थोड्याच दिवसांत नुसता आमरस खाणं कंटाळवाणा वाटायला लागतं, मग आंब्याचं काही वेगळं, चविष्ट आणि आरोग्यदायी बनवावं असं मनात येतं.
आंब्याचे घारगे अजून ट्राय केले नसतील, तर एक खास आणि पारंपरिक मराठी स्वाद तुम्ही नक्कीच मिस करताय.
हापूस आंब्याचं गर, गूळ, गव्हाचं पीठ, मीठ, तेल, पाणी, वेलची पावडर.
आंब्याचे घारगे तयार करण्यासाठी हापूस आंबा स्वच्छ धुवून सोलावा आणि मग त्याचे लहानसहान बारीक तुकडे करून घ्यावेत.
मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे टाकून पेस्ट तयार करा. नंतर ती पेस्ट गूळ घालून मोठ्या भांड्यात मंद आचेवर शिजवा.
आंब्याचा गर नीट शिजल्यानंतर घट्ट होतो, तेव्हा तो गाळणीने गाळा म्हणजे सुरळीत आणि एकसंध मिश्रण तयार होईल.
शिजवलेल्या आंब्याच्या गारमध्ये वेलची पूड, मीठ आणि गव्हाचं पीठ चवीनुसार घालून नीट मिक्स करा.
पीठ नीट मळून झाकून ठेवल्यानंतर छोटे गोळे करून पुरीसारखे लाटून गरम तेलात कुरकुरीत तळून घारगे तयार करा.
आता सोप्या पद्धतीने बनवलेले आंब्याच्या रसाचे कुरकुरीत आणि स्वादिष्ट घारगे तयार आहेत, जे तुम्हाला नक्कीच आवडतील.