Tandoori Aloo Tikka: चिकन तंदुरी विसरा! घरच्याघरी बनवा स्वादिष्ट आणि चवदार तंदुरी आलू टिक्का, वाचा रेसिपी

Dhanshri Shintre

अधिक प्रसिद्ध

रेस्टॉरंटमध्ये अधिक प्रसिद्ध असलेला आलू टिक्का हा एक लोकप्रिय उत्तर भारतीय स्टार्टर घराघरांत मात्र कमी पाहायला मिळतो.

आलू टिक्का

तंदुरी चव असलेले हे स्वादिष्ट आलू टिक्का मुलांना आवडतात कारण ते खाण्यास मजेदार आणि कुरकुरीत असतात.

घरी बनवणं सोपं

आलू टिक्का ओव्हन, एअर फ्रायर किंवा पॅनमध्ये सहज तयार करता येतो, त्यामुळे घरी बनवणं सोपं आहे.

साहित्य

बटाटे, मीठ, कश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, पाणी, दही, आले लसूण पेस्ट, हळद, धणे पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी, बेसन, तेल.

कृती

लहान बटाटे धुवून सोलावेत आणि मग त्यात मीठ मुरवण्यासाठी प्रत्येक बटाट्यावर टूथपिकने दोन छिद्र करा.

पाणी घालून उकळा

एका भांड्यात मीठ, काश्मिरी तिखट, गरम मसाला आणि पाणी घालून उकळा. नंतर हे पाणी गाळून थंड होण्यासाठी ठेवा.

दही घेऊन मसाले घाला

जाडसर दही मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन त्यात आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, गरम मसाला, हळद, धणे पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी मिसळा.

बेसन घाला

मसाल्याचं मिश्रण तयार केल्यावर त्यात एक टेबलस्पून बेसन किंवा सत्तू आणि एक टेबलस्पून तेल घालून सर्व नीट मिसळा.

मॅरीनेट करा

उकडलेले बटाटे तयार मसाल्यात घालून नीट मॅरीनेट करा आणि मिश्रण थंड ठिकाणी ३० ते ४५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

ग्रिल करा

ग्रील ट्रेला तेल लावून मॅरीनेट केलेले बटाटे १५ ते २५ मिनिटे ग्रिल करा आणि १५ मिनिटांनी स्कीवर्स पलटून शिजवा.

साध्या तव्यावरही बनवू शकता

तुम्ही तेल लावलेल्या ग्रिल पॅनवर किंवा साध्या तव्यावरही हा आलू टिक्का ग्रिल करून स्वादिष्ट बनवू शकता.

सर्व्ह करा

गरम तंदुरी आलू टिक्क्यावर बटर लावून कांदा, लिंबाच्या फोडी आणि हिरव्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.

NEXT: नाश्त्यासाठी हटके पर्याय! नक्की ट्राय करा कर्नाटकी क्रिस्पी स्नॅक्स निप्पट्टू, वाचा रेसिपी

येथे क्लिक करा