Siddhi Hande
मराठी मालिकांमधील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
मालिकेत सध्या ऋषिकेश आणि जानकीचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्तत रणदिवे कुटुंबियांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरवले आहे.
लग्नासाठी जानकी म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने खास लूक केला आहे.
जानकीने राखाडी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर डायमंड डिझाइन असलेला पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.
तिच्या या साडीवर सुंदर डिझाइन आहे. रेश्मा या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
रेश्माने या साडीवर मोत्याचा हार आणि साउथ इंडियन ज्वेलरी घातली आहे.
जानकी आणि ऋषिकेशची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.