Manasvi Choudhary
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा आहे.
मुंबईच्या वरळीमध्ये हा विजयी मेळावा पार पडत आहे.
या विजयी मेळाव्याला कलाकार देखील उपस्थित आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता सिद्धार्थ जाधवने हजेरी लावलेली दिसतेय.
तसेच अभिनेता भरत जाधव, अभिनेत्री चिन्मयी सुमित हे कलाकार आतापर्यंत हजर झाले आहेत.
मोठ्या उत्साहात कलाकारांनी मेळाव्याला हजेरी लावलेली दिसत आहेत.
रांगोळ्या, पारंपारिक ढोलवादक मराठी संस्कृतीमध्ये मेळाव्याला सुरूवात झालेली आहे.
लेखक, दिग्दर्शक अजित भूरे हे विजयी मेळाव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.