New Houses Of Marathi Celebs : सई ताम्हणकर ते हृता दुर्गुळे; सरत्या वर्षात 'या' मराठी सेलिब्रिटींची झाली नव्याघराची स्वप्नपुर्ती

Chetan Bodke

मराठी सेलिब्रिटींच्या स्वप्नातलं घर

प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी धडपड करीत असतो. चाहत्यांना खळखळून हसवणारे सेलिब्रिटीही कायमच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करीत असतात.

Home | Saam TV

नवं घर

२०२३ या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपलं स्वत:च घर घेत आपली स्वप्नपुर्ती केली आहे, चला जाणून घेऊया...

New Home | Canva

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीने जुलै महिन्यामध्ये, डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर घेतलं आहे.

Prajakta Mali Brought New House | Instagram/ @prajakta_official

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. खूप मेहनतीनंतर आता सईने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं आहे.

Sai Tamhankar Brought New House | Instagram/ @saietamhankar

धनश्री काडगावकर

'तू चाल पुढं' आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे धनश्री काडगावकर प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सप्टेंबर महिन्यामध्ये नवं घर खरेदी केलं आहे.

Dhanashri Kadgaonkar Brought New House | Instagram

हृता दुर्गुळे

अवघ्या महाराष्ट्राची क्रश म्हणून चर्चेत असलेल्या हृता दुर्गुळेनेही नुकतंच नवं घर खरेदी केलं आहे. नव्या घरातील पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिलं आहे.

Hruta Durgule Brought New House | Instagram/ @hruta12

अक्षय केळकर

'बिग बॉस मराठी ४' फेम अभिनेता अक्षय केळकरसाठी २०२३ हे वर्ष खास ठरलं आहे. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला 'बिग बॉस मराठी ४'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी त्याला मुंबईमध्ये म्हाडाचं घर लॉट्रीमध्ये मिळालं.

Akshay Kelkar Brought New House | Instagram

पृथ्वीक प्रताप

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर पृथ्वीक प्रतापने काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हक्काचं घर घेतलं आहे. त्याला मुंबईमध्ये म्हाडाचं घर लॉट्रीमध्ये मिळालं.

Pruthvik Pratap Brought New House | Instagram

ऋतुजा बागवे

अभिनेत्री ऋतुजा बागवेने नुकतंच ठाण्यामध्ये स्वप्नातलं घर घेतलं आहे. ऋतुजा बागवेचं स्वप्नातलं स्वत:चं हक्काचं घर तिच्यासाठी खूपच स्पेशल आहे.

Rutuja Bagwe Brought New House | Instagram

NEXT: तुझं निरागस हसू मलाही धुंद करते...

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar
येथे क्लिक करा...