ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएल २०२५ च्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात खेळला जाणार आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात दोन मराठमोळे खेळाडू संघासाठी मोठी जबाबदारी पार पडताना दिसणार आहे.
या आयपीएलमध्ये मराठमोळा अजिंक्य रहाणे गतविजेता कोलकात संघाचे नेतृत्व करणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने 1.5 कोटी रूपये मोजत रहाणेला संघात सामील केले.
अजिंक्यने १८५ सामन्यांमध्ये ४६४२ धावा केल्या आहेत. यामध्ये ३० अर्धशतक, आणि २ शतकांसह, नाबाद १०५ धावांची सर्वोत्तम खेळीचा देखील समावेश आहे.
2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडला २० लाख रुपये मोजत संघाचा भाग बनवला. २०२४ मध्ये महेंद्र सिंह धोनीनंतर संघाने कर्णधारपदाची कमान ऋतुराजकडे सोपवली.
ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या ६६ सामनांच्या ४१.७५च्या सरासरीने ६५ डावांमध्ये २३८० धावा केल्या. नाबाद २ शतकीय खेळीचाही समावेश आहे.
गायकवाडने २०२१ च्या आयपीएल एका हंगामात ६३५ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती.