Chetan Bodke
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सध्या आपल्या नवनव्या फोटोंमुळे कमालीची चर्चेत आहे.
नुकतंच अभिनेत्रीने गुजराती स्टाईलमध्ये हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे. सध्या तिच्या स्टाईलची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, वनिताने पेडणा कलामकरीची मल्टीकलर साडी परिधान करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने या लूकवर ऑक्साईड दागिने परिधान करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
वनिताच्या ह्या नव्या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यामातून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये वनिता खरात प्रसिद्ध झाली.
वनिता खरात चाहत्यांमध्ये फक्त अभिनयामुळेच नाही तर, तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळेही प्रसिद्ध आहे.
वनिता कायमच सोशल मीडियाच्या माध्यामतून तिचे फोटोज्, हास्यजत्रेसंबंधित आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट्स शेअर करत असते.
वनिताने फेब्रुवारी २०२३ मध्ये बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. अनेकदा वनिता आपल्या पतीसोबत फोटो शेअर करते.