Titeeksha Tawde: तितीक्षा तावडेचा होणारा नवरा आहे तरी कोण?

Priya More

तितीक्षा तावडे चर्चेत

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या चर्चेत आहे.

Titeeksha Tawade | Instagram @titeekshaatawde

अडकणार विवाहबंधनात

तितीक्षा तावडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत लग्न करणार आहे.

Titeeksha Tawade | Instagram @titeekshaatawde

लग्नाची गोड बातमी

तितीक्षाने नुकताच इन्स्टावर सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत लग्नाबाबतची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

Titeeksha Tawade | Instagram @titeekshaatawde

शुभेच्छांचा वर्षाव

तितीक्षा लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Titeeksha Tawade | Instagram @titeekshaatawde

जुनी मैत्री

तितीक्षा आणि सिद्धार्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री खूपच जुनी आहे.

Titeeksha Tawade And Siddharth Bodke | Instagram @siddharthbodkeofficial

इथे झाली पहिली भेट

२०१५ साली ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका हे दोघेजण साकारत होतो. इथेच त्यांची मैत्री झाली.

Siddharth Bodke | Instagram @siddharthbodkeofficial

दिसले मुख्य भूमिकेत

दोघांनीही झी मराठीवरील 'तू अशी जवळी राहा' मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेमध्ये ते मनवा- राजवीरच्या भूमिकेत दिसले.

Siddharth Bodke | Instagram @siddharthbodkeofficial

'दृश्यम २' केलं काम

सिद्धार्थने ‘टाईम बरं वाईट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने 'दृश्यम २' चित्रपटात काम केलेय.

Siddharth Bodke | Instagram @siddharthbodkeofficial

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट

नुकताच सिद्धार्थ बोडकेचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Siddharth Bodke | Instagram @siddharthbodkeofficial

NEXT: Prathamesh Parab च्या खऱ्या आयुष्यातली 'प्राजू'चा सोज्वळ लूक

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style
येथे क्लिक करा...