Shreya Maskar
स्वानंदी टिकेकरला 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली.
अभिनय स्वानंदी टिकेकरने गायक आशिष कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली.
आता या दोघांनी नवीन घर घेऊन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
नवीन घराचे फोटो स्वानंदीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये स्वानंदी आणि आशिष नव्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून एकमेकांचे अभिनंदन करत आहेत.
सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.
स्वानंदी टिकेकरने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकले आहेत.
आशिष कुलकर्णी 'इंडियन आयडॉल सीझन १२' मध्ये सहभागी झाला होता.