Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
नुकतंच अभिनेत्रीने ‘गुढीपाडवा’ सण साजरा करताना खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
पिवळी साडी, मोकळे केस सोडत अभिनेत्रीने खूप सुंदर गुढी सोबत फोटो शेअर केले आहेत.
साडीला सोनेरी वर्क केलेली काठ असून ती फोटोमध्ये खूपच सुंदर दिसते.
नाकात नथ, गळ्यात हार, हातात बांगड्या असे लूकला साजेसा मराठमोळा दागिने तिने कॅरी केला आहे.
“सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट! आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात! नव्या वर्षाची सोनेरी सुरवात” असं कॅप्शन अभिनेत्रीने देत फोटो शेअर केले.
सोनालीने लूकवर साजेसा मेकअप केला असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंवर अभिनेत्रीने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.