Priya More
मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चाहत्यांवर आपल्या सौंदर्याची जादू करत असते.
आपल्या हटके स्टाइल आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
सोनाली कुलकर्णीने हिरव्या रंगाच्या वनपीसमध्ये फोटोशूट केले आहे. नव्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
लाइट मेकअप, ओपन हेअर आणि हाय हिल्स कॅरी करत सोनालीने लूक परिपूर्ण केला आहे.
सोनाली कुलकर्णीने हे फोटो शेअर करत 'ती एक सुंदर उबदार संध्याकाळ होती' असे कॅप्शन दिले आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.