Chetan Bodke
'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे.
सोनाली कुलकर्णीचा येत्या मार्च महिन्यामध्ये बहुप्रतीक्षित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकतंच या चित्रपटाचा पोस्टर लाँचिंग इव्हेंट पार पडला, यावेळी तिने पांढऱ्या साडीवर नेसली होती. या दरम्यान अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या रंगाची जरीची साडी नेसून सोनालीने खूप सुंदर फोटोशूट केलंय.
सोनालीने पांढऱ्या रंगाची सिंपल साडी परिधान करत त्या लूकवर मराठमोळा साज केला होता. या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत होती.
नाकात नथ, गळ्यामध्ये हार असा तिने लूक केला असून तिच्या चेहेऱ्यावरील निखळ हास्याची जोरदार चर्चा होत आहे.
सोनालीच्या मराठमोळ्या अंदाजावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोनाली कुलकर्णी ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटातून मल्याळम सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
सोनाली कुलकर्णीच्या ‘मलाइकोट्टई वालीबान’ आणि ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या दोन्हीही चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.