Shreya Maskar
'अप्सरा आली' या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सोनाली कुलकर्णीचा आज (18मे) वाढदिवस आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनाली कुलकर्णी अभिनय क्षेत्रात येण्याआधी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होती.
सोनाली कुलकर्णीचा जन्म पुण्यातील लष्करी हॉस्पिटलमध्ये झाला आहे.
सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले.
सोनालीने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता या विषयातील पदवी प्राप्त केली. तर 'इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट' ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले.
सोनाली कुलकर्णीला अभिनयाची आवड लहानपणापासून होती. शाळा-कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि मॉडेलिंगमध्ये ती पुढे असायची.
'हा खेळ संचिताचा' या मालिकेतून सोनालीचेने मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. त्यानंतर तिला 'गाढवाचं लग्न' या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली.
तिचा अभिनय आवडल्यामुळे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तिला 'बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटात मुख्य भूमिका दिली.