Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीव आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायलीची काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.
सायलीने नुकतेच पारंपारिक ब्लाउज-चोळीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सायलीने हिरव्या रंगाचा स्कर्ट, त्यावर चोळीचा ब्लाऊज आणि ओढणी घेतली आहे.
सायलीने नाकात नथ, गळ्यात मोत्याचा हार घालून पारंपारिक लूक केला आहे.
सायलीने हातात कमळाचे फूल घेऊन सुंदर फोटोशूट केले आहेत.
सायली संजीव या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.