Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
येत्या २ फेब्रुवारीला सईचा आणि सिद्धार्थ चांदेकरचा ‘श्री देवी प्रसन्न’ चित्रपट रिलीज होणार आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक हटके फोटोशूट करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.
सईने नुकतंच ऑफ येल्लो कलरचा फॅशनेबल वेस्टर्न ड्रेस तिने परिधान करीत तिने हटके फोटोशूट केले.
फ्लोरल प्रिंटेड वेस्टर्न आऊटफिटमध्ये सई खूपच सुंदर दिसते.
सईने या फॅशनेबल ड्रेसवर सुंदर मेकअप केलेला दिसत आहे.
हातामध्ये फ्लॉवर्स घेत आणि हटके पोजेस देत अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
खरंतर, अभिनेत्रीनेहा स्पेशल लूक हास्यजत्रेमध्ये प्रमोशनमध्ये जाताना केलेला आहे.
अभिनेत्रीच्या ह्या स्पेशल लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.