Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.
चित्रपट काल अर्थात २ फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला असून चित्रपटाला सध्या प्रेक्षकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सई ताम्हणकर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने पुण्यामध्ये प्रमोशन करीता हटके फोटोशूट केले आहे.
सईने नुकतंच एक फॅशनेबल वेस्टर्न आऊटफिट वेअर करून आणि हटके फॅशन करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
प्रिंटेड वेस्टर्न आऊटफिट परिधान त्या लूकला साजेसा मेकअप सईने केला आहे.
सईने या फॅशनेबल ड्रेसवर सुंदर मेकअप करत काही प्रमाणात रेट्रो लूक केलेला आहे. तिचा हा रेट्रो लूक नेटकऱ्यांना प्रचंड भावला.
हातामध्ये सनफ्लॉवर्स घेत आणि हटके पोजेस देत अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी सईने हा गॉर्जियस लूक केला आहे.
अभिनेत्रीच्या ह्या स्पेशल लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.