Chetan Bodke
मराठीसह बॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी सई ताम्हणकर सध्या कमालीची चर्चेत राहिलेली आहे.
सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच सईच्या वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकतंच सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एका स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर केलेले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सईने ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीचा हा हटके लूक नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून सध्या तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.
ग्लॉसी मेकअप, डार्क लिपस्टिक आणि तिने हेयर बन करून आपला लूक पूर्ण केलेला आहे.
सई कायमच आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा खूप प्रयत्न करते. त्या फॅशनमुळे ती अनेकदा ट्रोल सुद्धा होते.
यावेळी सईने ग्लॉसी मेकअप करीत स्मोकी आय शॅडो लावत तिने खूप सुंदर फोटोशूट केलंय.
अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर अवघ्या काही तासांतच हजारो लाईक्स मिळाले असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.