Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आपल्या लाडक्या चाहत्यांचे मालिका, नाटक आणि चित्रपटांतून निखळ मनोरंजन केले आहे.
ऋतुजा बागवे हिला सर्वाधिक प्रसिद्धी झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून आणि ‘अनन्या’ ह्या नाटकातून मिळाली आहे.
कायमच आपल्या खास अभिनयामुळे चर्चेत राहणारी ऋतुजा सध्या तिच्या स्टायलिश अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर साडीमध्ये काही स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केलेले आहेत.
ब्लॅक साडी, डिझायनिंग टेक्स्चर आणि ऑक्साईड दागिने वेअर करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले आहे.
या लूकवर ऋतुजाने ग्लॉसी मेकअप, स्मोकी आयलायनर लावलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याची सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.
ऋतुजाने अनेकदा इन्स्टाग्रामवर साडीमध्ये स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
सध्या ऋतुजाच्या सौंदर्याचे कौतुक होत आहेत.
ऋतुजाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.