Shruti Vilas Kadam
रुतुजा बागवेने साध्या पण आकर्षक हिरव्या कॉटन साडीत फोटोशूट केले असून तिचा एलिगंट लूक चाहत्यांना विशेष आवडला.
हिरव्या साडीसोबत तिने रॉयल ब्लू रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊस परिधान केला आहे. या रंगसंगतीने तिचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसतो.
हिरवळ आणि पावसाळी वातावरणात केलेल्या फोटोशूटमुळे प्रत्येक फोटोला नैसर्गिक आणि फ्रेश लूक मिळाला आहे.
रुतुजाने अतिशय हलका मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि नैसर्गिक बेस निवडला असून त्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
मोठे सिल्व्हर झुमके आणि साध्या अॅक्सेसरीजमुळे तिच्या पारंपरिक लूकला मॉडर्न एलिगन्सची जोड मिळाली आहे.
सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईल आणि नैसर्गिक स्माईलमुळे रुतुजाचा संपूर्ण लूक आणखी आकर्षक आणि फ्रेश वाटतो.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या साधेपणा, स्टाईल आणि पारंपरिक लूकचे भरभरून कौतुक केले आहे.