Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

मैदा, कॉर्नफ्लोअर, दही, चिमूटभर बेकिंग सोडा, केशर, साखर, वेलची पूड, तूप किंवा तेल आणि पाणी हे साहित्य तयार ठेवा.

Jalebi Recipe | Yandex

पीठ तयार करा

मैदा, कॉर्नफ्लोअर, दही आणि पाणी एकत्र करून गुळगुळीत पीठ तयार करा. हे पीठ ८ ते १० तास झाकून ठेवा, जेणेकरून ते चांगले फर्मेंट होईल.

Jalebi | yandex

केशर पाक बनवा

एका भांड्यात साखर आणि पाणी उकळा. त्यात केशराचे धागे आणि वेलची पूड घालून एकतारी पाक तयार करा.

Jalebi

जिलेबीचा आकार द्या

तयार पीठ स्क्विझ बॉटल किंवा कापडी पिशवीत भरून गरम तेल किंवा तुपात गोल-गोल जिलेबीचा आकार काढा.

Jalebi

सोनेरी होईपर्यंत तळा

जिलेबी दोन्ही बाजूंनी खमंग आणि सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळा.

Instant Jalebi Recipe | yandex

गरम जिलेबी पाकात बुडवा

तळलेली गरम जिलेबी लगेच कोमट केशर पाकात ३० ते ६० सेकंद बुडवून ठेवा, त्यामुळे ती रसाळ आणि स्वादिष्ट बनेल.

Jalebi | Ai Generator

सजवून सर्व्ह करा

तयार केशर जिलेबीवर पिस्ता किंवा बदामाचे काप घालून गरमागरम सर्व्ह करा. रबडीसोबत खाल्ल्यास चव आणखी खुलते.

Jalebi | yandex

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Monsoon Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा