Shraddha Thik
प्रिया बापट आणि उमेश कामत ही अत्यंत लाघवी जोडी. गेल्या १८ वर्षांपासून हे दोघं एकत्र आहेत.
दोघांमध्ये 8 वर्षांचं अंतर असून प्रियाला होकार देण्यासाठी उमेशने बराच वेळ घेतला होता. कशी झाली होती दोघांची भेट पाहूयात.
18 वर्षांपासून ही एकत्र असणारी जोडी कशा पद्धतीने नाते जपत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. हल्ली अनेक जोडप्यांचे 1 वर्षाच्या आत घटस्फोट होताना दिसतात.
12 वी मध्ये असतानाच आपण उमेशच्या प्रेमात असल्याचा खुलासा ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात प्रियाने केला होता.
प्रियाने जेव्हा उमेशला प्रपोज केले होते, तेव्हा ती फारच लहान होती आणि उमेशने होकार द्यायलाही बराच वेळ घेतला होता.
2011 मध्ये दोघांनी घरच्यांच्या मर्जीने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला आता १२ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही नव्या प्रेमात असल्यासारखी ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर दिसून येते.
प्रिया आणि उमेश नेहमीच एकमेकांविषयी प्रेम जपतात आणि व्यक्त करताना दिसतात.