Shreya Maskar
मराठीसोबत हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी प्रिया बापट कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
प्रिया बापटने फिल्मफेअरला सुंदर पारंपरिक लूक केला होता. याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ड्रेसवर नक्षीकाम खूपच सुंदर दिसत आहे.
मोकळे केस आणि कानात मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मिनिमल मेकअपमध्ये प्रियाचे सौंदर्य खुलून आले आहे.
फोटोतील तिच्या कातिल अदा आणि निखळ हास्य पाहून चाहते वेडे झाले आहेत.
प्रियाच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
प्रिया बापट आणि उमेश कामत आता लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.