Chetan Bodke
अभिनेत्री प्राजक्ता माळी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून बिझनेस वुमन आणि चित्रपट निर्माती आहे.
प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी 'प्राजक्तराज' नावाचा ज्वेलरी बिझनेस सुरू केला. तिच्या ज्वेलरीची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते.
दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही प्राजक्ताने एक नवा दागिना लाँच केला आहे.
त्या नव्या दागिन्यांसोबत अभिनेत्रीने काही फोटोज् शेअर केले असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
जुलै महिन्यामध्ये 'प्राजक्ताराज' मधील म्हाळसा कलेक्शनमधील एक नवा दागिना लाँच झालेला आहे.
यामध्ये, दोन पदरी बोरमाळ आणि एकदाणी माळ अशे दोन दागिने लाँच झाले आहेत. या पारंपारिक दागिन्यांमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने घातलेले सर्व दागिने हे ऑक्साईडचे असून ती दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
ब्लॅक कलरचा घागरा वेअर करून आणि लूकला साजेसा मेकअप करून अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ता माळीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.