ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आणि व्यावसायिकादेखील आहे.
प्राजक्ताने या वर्षी प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला.
प्राजक्ताने २०२३ मध्ये आपले स्वतः चे फार्म हाऊस विकत घेतले आहे.
वर्ष संपण्यापूर्वी प्राजक्ताचे सोशल मीडियावर २ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.
२०२३ हे वर्ष प्राजक्तासाठी खूप आनंदाचे आणि यशस्वी गेले आहे, असं म्हणायला हरकत नाही.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर इंडो-वेस्टर्न घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.