Shruti Vilas Kadam
मिथिला पालकरने जांभळ्या रंगाची आकर्षक साडी परिधान करत पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ सादर केला.
हलका मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि नैसर्गिक लूकमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसले.
मोठे सिल्व्हर इअररिंग्स आणि साध्या अॅक्सेसरीजमुळे तिच्या संपूर्ण लूकला एलिगंट टच मिळाला.
सॉफ्ट वेव्ही मेसी ब्रीड हेअरस्टाइलने तिच्या लूकमध्ये ग्लॅमरची भर घातली.
फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी "गॉर्जियस", "एलिगंट" आणि "ब्युटिफुल" अशा कमेंट्स करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
मिथिला लवकरच तेलुगू वेब सिरीज 'नो बीन्स नो नेटफ्लिक्स' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिच्या या नव्या प्रोजेक्टचीही चर्चा रंगली आहे.
लग्नसमारंभ, सण किंवा खास कार्यक्रमांसाठी मिथिलाचा हा साडी लूक फॅशनप्रेमींसाठी उत्तम स्टाईल इन्स्पिरेशन ठरू शकतो.