Manasvi Choudhary
मराठी इंडस्ट्रीतील चर्चेतील अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते.
ग्लॅमरस लूकने मानसीने अत्यंत कमी कालावधीत तिचं अनोख स्थान निर्माण केलं आहे.
नृत्यातील अदाकारीमुळे मानसी नाईकने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रिक्षावाली, बाई वाड्यावर या, मॅडम कडक आहे या आयटम साँग्सने मानसीने मार्केट गाजवलं.
आजही मानसी नाईक तिच्या स्टाईलमुळे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच मानसीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
वेस्टर्न असो या ट्रेडिशनल लूक कोणत्याही लूकमध्ये मानसी उठूनच दिसते. तिचे फोटो व्हायरल होतात.
ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये मानसी हॉट दिसते आहे. मोकळे केस अन् मेकअप असा लूक मानसीने केला आहे.
मानसीच्या फोटोंवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.