Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
गायत्री दातार सध्या अबीर गुलाल या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
अबीर गुलाल मालिकेत गायत्री शुभ्रा हे पात्र साकारत आहे.
मालिकेत सध्या शुभ्रा आणि अगसत्याच्या लग्नाची घाई सुरु आहे.
गायत्रीने मेहंदी सोहळ्यासाठी खास लूक केला आहे.
नारंगी रंगाचा सुंदर डिझाइन असलेला घागरा गायत्रीने परिधान केला आहे.
या घागऱ्यावर तिने सुंदर दागिने घालून साजश्रृगांर केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.