ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गौतमीने नुकतेच लाल साडीतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मरुन साडी आणि लाल पदर असं या साडीचं कलर कॉम्बीनेशन आहे.
गौतमी या साडीत कमालीची सुंदर दिसतेय.
गौतमी नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते.
मनोरंजन विश्वात तिने आपल्या अभिनयाला आजवर पूर्णपणे न्याय दिला आहे.
गौतमी तिची बहिण मृण्मयीसोबत नेहमीच मजा मस्ती करताना सोशल मीडियावर दिसते.
काही दिवसांपूर्वीच गौतमीचं लग्न झालं आहे. सध्या ती आपल्या सुखी संसारात मग्न आहे.
गौतमी ३१ जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा करते.