Chetan Bodke
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक अश्विनी भावेने दाखवली आहे.
१९९० च्या काळात आश्विनी भावेने चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
'अशी ही बनवाबनवी', 'वजीर', 'धडाकेबाज' 'ध्यानीमनी' सह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आश्विनी भावे कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून खास अंदाजातील फोटो शेअर करत असतात.
नुकतंच आश्विनी भावे यांनी चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर बॉसी लूक शेअर केला आहे.
नव्या लूकमध्ये अभिनेत्री आश्विनी भावेने प्रिंटेड ब्लेझर घालत हटके फोटोशूट केले आहे.
सोबतच ब्लॅक कलरचा वनपिस आणि इयर रिंग्ज घालत आश्विनी भावेंनी फोटोशूट केले आहे.
सोबतच आश्विनी भावेंनी या लूकवर नॉर्मल मेकअप करत आपला संपूर्ण लूक केला आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.