Shraddha Thik
आपल्या ठसकेबाज आणि बहारदार नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अमृता खानविलकरने सिनविश्वामध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे आणि डान्समुळे प्रकाशझोतात आलेली अमृता सध्या तिच्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
नुकतंच अमृता खानविलकरची ‘लुटेरा’ही वेबसीरीज ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे.
वेबसीरीजच्या प्रमोशननिमित्त अमृताने खास वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट तिने केलेले आहे.
ब्लू कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट, ब्लॅक ड्रेस वेअर करत अमृताने कातिल अंदाजामध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले.
ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर असा अमृताने आपला संपूर्ण मेकअप केलेला आहे.
अमृताच्या नव्या स्टायलिश अंदाजातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.