Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अत्यंत आकर्षक अन् प्रभावी सौंदर्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्याने वयाची पन्नाशी ओलांडली तरी तिचं सौंदर्य लाजवाब आहे नुकतेच तिने व्हिडीओ शेअर केली आहे.
काठपदरी साडी अन् कपाळी चंद्रकोर टिकली असं तिचं काळजाला भिडणारं सौंदर्य आहे. ऐश्वर्याने सुंदर साडी गेटअपमधील व्हिडीओ शेअर करत फॅन्सची मने जिंकली आहेत.
या साडीतील ऐश्वर्याचं सौंदर्य तिच्या रूपाला पारंपारिक टच देत आहे. हलकासा मेकअप आणि लाल टिकलीमुळे ऐश्वर्याच्या सौंदर्यात तेज आलं आहे.
ऐश्वर्याच्या लांबसडक केसांमुळे ती खुपच सुंदर दिसत आहे. ऐश्वर्या नारकर केसांची काळजी घेतात. त्या सिंपल हेअरस्टाईलमध्येही अत्यंत खुलून दिसतात.
ट्रेडिशल असो या वेस्टर्न कोणत्याही लूकमध्ये ऐश्वर्या नारकर याचं लूक उठून दिसतो त्या नेहमीच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात.
ऐश्वर्या नारकर आपल्या सोशल मीडियात योगा, ट्रेंडिंग रिल आणि ब्यूटी याविषयी मार्गदर्शनाचे विविध व्हिडीओ पोस्ट करत असते.
ऐश्वर्या नारकर फिट राहण्यासाठी नियमितपणे योगा करतात हे देखील व्हिडीओ त्या शेअर करतात.