Manasvi Choudhary
शरीराच्या निरोगी आरोग्यासाठी विविध भाज्यांचे, कडधान्यांचे सलाड खाल्ले जाते. हिरव्या मुगांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह,कॅल्शियम, पोटॅशियम हे पौष्टिक घटक असतात.
प्रोटीन्सयुक्त मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सलाड शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हिरव्या मुगाचे सलाड घरच्या घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
हिरव्या मुगाचे सलाड बनवण्यासाठी उकडलेले मुग, गाजर, मीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, काळा मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी हिरव्या मुग ५ ते ६ तास आधी भिजत घाला म्हणजे त्यांना मोड येतील. यानंतर हे मोड आलेले हिरवे मुग कुकरमध्ये मऊ होईपर्यंत उकडून घ्या.
मूग उकडून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर आणि हिरवी मिरची मिक्स करा.
या मिश्रणात मीठ, काळा मीठ आणि चाटमसाला टाका. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. या मिश्रणात तुम्ही लिंबाचा रस आणि कोथिंबीर मिक्स करा.
अशाप्रकारे घरच्या घरी नाश्त्यासाठी हेल्दी हिरव्या मुगाचे सलाड तयार करा.