Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे.
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे पाणी कमी प्यायले जाते यामुळे शरीर डिहायड्रेट होते. थंडीत तुम्ही फळांचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
यासाठी आज आम्ही तुम्हाला घरीच संत्र्याचा रस कसा बनवायचा? ही रेसिपी सांगणार आहोत.
संत्र्याचा रस बनवण्यासाठी सर्वात आधी संत्री धुवून सोलून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये संत्रीमधील बिया काढून टाका कारण बिया असल्याने संत्र्याचा रस कडू होतो.
या मिश्रणात तुम्ही चवीनुसार साखर, मीठ आणि जिरा पावडर मिक्स करू शकता. यानंतर हे मिक्सरमध्ये योग्यरित्या फिरवून घ्या म्हणजेच संत्र्याचा रस तयार होईल.
तयार संत्र्याचा रस चाळणीने एका ग्लासमध्ये गाळून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी थंडगार संत्र्याचे रस घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करा.