Shreya Maskar
'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला असून सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.
'छावा' चित्रपटात मराठी अभिनेता संतोष जुवेकर 'रायाजी' च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
एका मिडिया मुलाखतीत संतोष जुवेकरने सांगितले की, 'छावा' चित्रपटातील एक डायलॉग मी लिहिला आहे.
चित्रपटात एक सीन आहे, जेव्हा महाराजांच्या मानेवर धाराऊ यांना घाव दिसतो.
तेव्हा धाराऊ म्हणतात की, "ये क्या युवराज फिर से नजर उतारनी पडेगी".
तेव्हा सीनमध्ये संतोष जुवेकर मराठीत एक डायलॉग बोलतो आणि त्यानंतर त्याचे हिंदीत भाषांतर करण्यात आले.
मराठी डायलॉग - "अगं आऊ... अख्ख्या स्वराज्याची नजर ज्याच्यावर आहे त्याला कोणाची नजर लागणार"
चित्रपटातील "अगं आऊ... पुरे स्वराज्य की नजर जिसपर है, उसे क्या किसी की बुरी नजर लगेगी" हा डायलॉग संतोषने लिहिला आहे.