Priya More
‘टाईमपास’ चित्रपटातील 'दगडू' अर्थात अभिनेता प्रथमेश परब सध्या चर्चेत आला आहे.
दगडू अर्थात प्रथमेशला रिअल लाइफमधील प्राजू मिळाली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
प्रथमेश परबने आपला ३० वा वाढदिवस गर्लफ्रेंडसोबत साजरा केला. आपल्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसोबतचा प्रथमेशचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडचे नाव क्षीतिजा घोसाळकर आहे. क्षीतिजानेच इन्स्टावर पोस्ट करत प्रथमेशला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रथमेश परब सध्या क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. हे कपल खूपच क्यूट आहे.
क्षीतिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. ती फॅशन डिझायनिंग सुद्धा करते.
प्रथमेशच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियरला क्षीतिजा आवर्जून उपस्थिती लावते.
प्रथमेश परबला त्याच्या प्रत्येक कामात त्याची गर्लफ्रेंड क्षीतिजा घोसाळकर मदत करते.
प्रथमेशला रिअल लाइफमध्ये प्राजू भेटल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.