Sakshi Sunil Jadhav
छ. शिवरायांनी समुद्राची बाजू सुरक्षित करण्याच्या हेतूने आरमाराची स्थापना केली होती. मराठ्यांच्या या आरमारात वेगवेगळ्या जहाजांचा समावेश होता. त्याचाच आढावा आपण घेणार आहोत.
मराठीत याचा अर्थ चांगल्या प्रकारे सुसज्ञ्ज, समुद्रातून आरामशीरपणे जाणारा, चांगलं सामान आणि चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेला मचवा असा आहे.
मचवा हे मोठं मालवाहू जहाज होतं. त्याचं शीड चौरसाकृती होतं आणि त्याला एक डोलकाठी होती.
रत्नागिरीच्या किनारपट्टीवर एक ते तीन टन वजनांची 'मचवा' किंवा 'मछुवा' जहाजं होती. पोर्तुगीज याचा उच्चार 'मन्छुवा' असा करत होते.
शिबाद हे एक मोठं फटिमार व्यापारी जहाज होतं. त्याचा तोफा डागण्याचा मागचा भाग चौरसाकृती होता. त्याला दोन शिडं होती, पण डेक नव्हतं. फटिमार हे खोल, अरुंद जहाज होतं.
अतिशय वेगवान होतं आणि नौकानयनाचं अत्यंत विलक्षण जहाज होतं, परंतु मराठी भाषेत याला तारंब-तारंड असं म्हटलं जात होतं. याला तरांड असंही म्हणतात.
तीन शिडं असलेली गुराबा ही सुमारे १५० ते ३०० टन वजनाची असतात. त्यांच्यावर दोन किंवा तीन डोलकाठ्या असतात आणि प्रत्येक डोलकाठीवर एकावर एक अशी दोन चौरस शिडं असतात.
पुढच्या दिशेला मारा करण्यासाठी जहाजाच्या पुढच्या भागात नऊ ते बारा पाऊंडरच्या दोन तोफा ठेवलेले असायचे. रुंद बाजूची तोफ ही सहा ते नऊ पाऊंडरची असायची.
गलबत या मोठ्या वल्ह्यानं चालवण्याच्या नौका आहेत. त्यांची जडणघडण गुराबासारखीच आहे, परंतु त्यांचा आकार आणखी लहान आहे. ते त्रिकोणाकृती आणि खूपच मोठं असत.
त्यांच्यावर दोन ते चार पाऊंडरच्या सहा किंवा आठ तोफा ठेवलेल्या असतात. त्यांच्यामध्ये चाळीस किंवा पन्नास भक्कम शरीरयष्टीचे वल्हेकरी असत आणि ताशी चार मैल वेगानं ही जहाजं वळवली जाऊ शकतात.