Sakshi Sunil Jadhav
हिरवी कच्ची केळी, हळद, मसाला, धणे-जिरे पावडर, ओरेगॅनो, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांद्याची पात, हिंग, मीठ, कॉर्न फ्लॉवर, तेल, ओवा इ.
सर्वप्रथम कच्चे केळ किसून पाण्यात भिजत ठेवा.
साधारण १० मिनिटांनी केळी गाळून त्यातले पाणी हाताने पिळून एका भांड्यात ठेवा.
आता केळींमध्ये हळद, मसाला, धणे-चीरे पावडर, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांद्याची पात, मीठ मिक्स करा.
आता साहित्यात मक्याचे पीठ घालून छान मिक्स करून घ्या.
आता एका पात्रात फोडणीसाठी तेल तापवून ओवा, जीरं, हिंग घाला. ही फोडणी साहित्यावर टाका.
आता हे मिश्रण तयार मिश्रणात घालून कणकेप्रमाणे पातळ मळून घ्या. यात पाण्याची आवश्यकता नाही.
आता तेल गरम करून गॅस स्लो करून कांदा भजी प्रमाणे भजी कुरकुरीत तळून सर्व्ह करा.