Sakshi Sunil Jadhav
जेव्हा तुम्हाला वारंवार ढेकर , छातीत जळजळ, पोट फुगणे, आंबट पाणी तोंडात येणे अशा समस्या जाणवतात तेव्हा अॅसिडिटी झालीये समजायचं.
तुम्हाला काही अन्न खाल्यावर पोटात त्रास होतो तेव्हा अॅसिडिटी झालेली असते.
रिकाम्या पोटी जेवणानंतर थंड दूध प्या.
तुम्ही जेवल्यानंतर किंवा रिकाम्या पोटी दूध पिता तेव्हा पोटातील अॅसिड न्यूट्रल होतं.
४ ते ५ तुळशीची पानं चावून खाल्याने अॅसिडिटी कमी होते.
शिजवलेला मऊ भात, मुगाची खिचडी आणि दही हाच आहार घ्या.
मसालेदार, तेलकट, आंबट अन्न अजिबात घेऊ नका.
१ चमचा कोमट पाण्यात जिरं उकळून दिवसातून दोन वेळेस प्या.
पपई, केळं, ताक, लस्सी, रव्याची पेज पिणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.