ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरुवात झाली आहे. पावसात ट्रेकिंगला जाण्याचा मोह अनेकांना आवडत नाही.
पावसाळ्यात तुम्ही महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाणी ट्रेकिंगला जाऊ शकतात.
अहमदनगर जिल्ह्यातील सांधन व्हॅली हे पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे अनेकदा लोक रात्री मुक्कामदेखील करतात.
महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. पावसाळ्यात कळसुबाई शिखरावरील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासारखे असते.
मुंबईपासून २-३ तासाच्या अंतरावर असलेला हरिश्चंद्र गड हा ट्रेकिंग करण्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेला हरिहर किल्ला खूप सुंदर आहे. या किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत.
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी तुम्ही राजगडावर जाऊ शकता. समुद्रसपाटीपासून ४,५१४ उंचीवर असलेल्या या किल्ल्यावरुन निसर्ग खूप सुंदर दिसतो.
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना विशेष काळजी घ्यावी. ट्रेकिंगला जाताना सोबत ट्रेनरला नक्की घेऊन जा.