Surabhi Jayashree Jagdish
मालाडमधील मनोरी हे पावसाळ्यात फिरण्यासाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे.
'मिनी गोवा' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या गावाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते.
मालाडमधील मार्वे बीचवरून फेरीने किंवा दहिसर चेक नाका मार्गे रस्त्याने तुम्ही इथे पोहोचू शकता.
हा मनोरीचा मुख्य आकर्षण केंद्र आहे. मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत हा बीच खूप शांत आणि कमी गर्दीचा असतो. नारळ आणि काजूच्या झाडांनी वेढलेला हा किनारा पावसाळ्यात अधिकच सुंदर दिसतो.
मनोरीच्या जवळच गोराईमध्ये असलेला हा पॅगोडा एक भव्य आणि शांत स्मारक आहे. विपश्यना ध्यान शिकण्यासाठी हे एक जागतिक केंद्र आहे.
मनोरीला 'मिनी गोवा' म्हटले जाते कारण इथे अनेक सुंदर चर्चेस आहेत. 'आवर लेडी ऑफ परपेच्युअल सक्कुर चर्च' आणि 'ओल्ड पोर्तुगीज चर्च' यांसारखी जुनी चर्चेस इथे आहेत, जी ऐतिहासिक वास्तुकलेचा नमुना आहेत.
मनोरी हे एक मासेमारीचे गाव आहे. पावसाळ्यात तुम्ही स्थानिक मच्छीमारांचे जीवन जवळून पाहू शकता. त्यांचे रंगीबेरंगी घरे आणि बोटींचे दृश्य पाहण्यासारखे असते.
मालाडच्या मार्वे बीचवरून मनोरीला जाण्यासाठी फेरीचा वापर केला जातो, ज्यामुळे ही खाडी पार करावी लागते. पावसाळ्यात खाडीचे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ खूप आकर्षक दिसते.