Siddhi Hande
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी काम करत आहे. आज त्यांनी मुंबईत उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी झटत आहेत. त्यांनी अनेक आंदोलने केली.
मनोज जरांगे पाटील हे शेतकरी आहेत. त्यांच्या नावावर एकही एकर जमीन नाही आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या नावावर दीड एकर जमीन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांनी समाजकार्यासाठी जवळपास अडीच एकर जमीन विकली होती.
२०१३ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहचावे म्हणून बीड, जालना, शहागड येथे नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते.
याचदरम्यान एक हत्ती आणि दोन घोडे दगावले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई झाली. त्यांना नुकसान भरपाई लागली. यामुळे त्यांना जमीन विकावी लागली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नावावर एकही वाहन नाहीये.