Unique Fort : चक्क ताऱ्याच्या आकाराचा किल्ला, 'ही' जगावेगळी रचना कुठे पाहायला मिळेल?

Shreya Maskar

ताऱ्याच्या आकाराचा किल्ला

कर्नाटकातील सकलेशपूर येथील मंजराबाद किल्ला वरून पाहिल्यास एखाद्या ताऱ्यासारखा दिसतो. हा 'आठ-कोनी ताऱ्याच्या' (eight-pointed star) आकारामुळे प्रसिद्ध आहे.

A star shaped fort | google

मांजराबाद किल्ला

मांजराबाद किल्ला १७९२ मध्ये म्हैसूर राज्याचा शासक टिपू सुलतान याने बांधला होता. हा किल्ला आपल्या अद्वितीय आकारासाठी ओळखला जातो.

Manjrabad Fort | google

शत्रूंपासून बचाव

किल्ल्यात फ्रेंच अभियंत्यांनी बाणाच्या टोकासारखे बुरुज डिझाइन केले होते. या रचनेमुळे शत्रूचा मारा परतवून लावतानाच, सर्व दिशांनी येणाऱ्या शत्रूवर तोफांद्वारे अचूक मारा करणे शक्य होत असे.

Protection from enemies | google

एकाच पातळीवरील रचना

पारंपरिक बहु-स्तरीय भारतीय गिरीदुर्गांच्या विपरीत, हा किल्ला केवळ एकाच जमिनीच्या पातळीवर वसलेला आहे. मंजराबाद किल्ला हा युरोपियन लष्करी शैलीत बांधलेला आहे.

Single level structure | google

मजबूत भिंती

बाहेरील संरक्षक भिंती मजबूत ग्रॅनाइट दगड आणि चुना-मिश्रित गारा वापरून बांधल्या आहेत, तर आतील खोल्या, स्वयंपाकघर आणि साठवणुकीच्या जागांसाठी थंड राहणाऱ्या भाजलेल्या विटांचा वापर केला गेला आहे.

Strong walls | google

जमिनीखालील दारूगोळा कोठार

मध्यभागी एक खोल विहीर असून तिच्याभोवती जमिनीखालील तळघरे आहेत; उन्हाळ्याच्या उष्ण दिवसांतही या तळघरांमुळे दारूगोळा थंड राहत असे.

Underground ammunition depot | google

शूटिंगचे ठिकाण

मांजराबाद किल्ला हे एक लोकप्रिय चित्रपट शूटिंग ठिकाण आहे. अनेक मोठ्या चित्रपटांचे, गाण्यांचे येथे शूटिंग झाले आहे.

Shooting location | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : शिवरायांचा इतिहास आजही जिवंत ठेवणारा किल्ला, सोलापूरमध्ये आहे 'हे' खास ऐतिहासिक ठिकाण

Solapur Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...