Shreya Maskar
अकलूज किल्ल्याला 'शिवसृष्टी किल्ला' म्हणूनही ओळखले जाते. हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज शहरात वसलेला आहे.
'शिवसृष्टी' म्हणून ओळखला जाणारा अकलूज किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिल्पे आणि भित्तिचित्रांच्या भव्य खुल्या प्रदर्शनासाठी ओळखला जातो.
अकलूज किल्ला यादव, मुघल आणि मराठा साम्राज्यांशी संबंधित असलेल्या आपल्या समृद्ध मध्ययुगीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यात नीरा नदीच्या काठावर अकलूज किल्ला वसलेला आहे. आज अनेकजण याला एक सुंदर खुले संग्रहालय म्हणून ओळखतात.
अकलूज किल्ल्याची निर्मिती १३ व्या शतकात यादव वंशातील राजा सिंघण याने केली होती.
सोलापूर जिल्ह्यातील पुण्यापासून सुमारे १७० किमी अंतरावर असलेल्या अकलूज किल्ल्यावर तुम्ही रस्त्याने किंवा रेल्वेने सहज पोहोचू शकता.
सोलापूरला गेल्यावर तुम्ही आवर्जून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जा. तसेच सोलापूर भुईकोट किल्ला ही आवर्जून फिरा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.