Shreya Maskar
माणिकगड किल्ला प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात पनवेलजवळ वसलेला आहे. तुम्ही येथे वीकेंडला ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
माणिकगड किल्ला हा पावसाळ्यातील निसर्गरम्य ट्रेकिंग, ऐतिहासिक टेहळणी चौकी आणि सह्याद्रीच्या रांगांचे विहंगम दृश्य यासाठी प्रसिद्ध आहे.
१८ व्या शतकात पनवेलजवळ सरखेल कान्होजी आंग्रे यांनी माणिकगड किल्ला बांधला होता. किल्ला धोरणात्मक टेहळणी चौकी आणि लष्करी ठाणे होते.
मावळ प्रदेश (पुणे) आणि किनारपट्टीवरील बंदरे यांना जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर या किल्ल्याचे नियंत्रण होते.
पनवेलपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे पनवेल स्टेशनपासून रिक्षा किंवा बसने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहचा आणि पुढे ट्रेकिंग करा.
दाट घनदाट जंगलातून येथे ट्रेकिंगची वाट निघते. किल्ल्यावरून आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचे आणि इतर किल्ल्यांचा नजारा पाहायला मिळतो.
पनवेलजवळ निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. यात कर्नाळा किल्ला, कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड किल्ला यांचा समावेश आहे, जिथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.