Mango : आंबा खाल्ल्यानंतर पाणी कधी प्यावे? आताच जाणून घ्या वेळ, अन्यथा होतील गंभीर आजार

Shreya Maskar

फळांचा राजा आंबा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे सहसा योग्य मानले जात नाही, यामुळे शरीराचा समस्या उद्भवतात. पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घेऊयात.

King of Fruits | pinterest

पचन बिघडते

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल पातळ होऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. तसेच पोटदुखीची समस्या उद्भवते.

Digestion | pinterest

ॲसिडीटी

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने गॅस, पोट फुगणे या समस्य उद्भवतात. तसेच पोटात आणि छातीत मळमळते.

Acidity | pinterest

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार, फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमकुवत होते आणि त्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये तयार होऊ शकतात, ज्यामुळे अपचन होते.

Ayurveda | pinterest

आंबा खाण्यापूर्वी करा 'ही' गोष्ट

आंबा हा गरम पदार्थ आहे. त्यामुळे तो खाण्यापूर्वी ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर आंब्याचे सेवन करा. शरीराला कोणतेही नुकसान किंवा ॲलर्जी होणार नाही.

Before Eating a Mango | pinterest

आंबा खाल्ल्यावर पाणी कधी प्यावी?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिण्यापूर्वी किमान ३० ते ४५ मिनिटे थांबणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. आंबे खाल्यावर ३० ते ४५ मिनिटांनी पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही.

Water | pinterest

पाण्याचे तापमान

आंबा खाल्ल्यावर पाणी पिताना त्याचे तापमान लक्षात घेणे खूपच गरजेचे आहे. थंड पाण्याऐवजी कोमट किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी प्या.

Water Temperature | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : केमिकलयुक्त डायला करा बाय बाय; 'या' एका पदार्थाने बदला केसांचा रंग, केस दिसतील रेशमी-चमकदार

Hair Colour Tips | pinterest
येथे क्लिक करा...