Hair Colour Tips : केमिकलयुक्त डायला करा बाय बाय; 'या' एका पदार्थाने बदला केसांचा रंग, केस दिसतील रेशमी-चमकदार

Shreya Maskar

केसांच्या वाढ

केसांना चांगले पोषण मिळण्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर ठरते. बीटरूट टाळूतील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस पातळ होत नाही.

Hair Growth | pinterest

केस गळणे कमी

बीटरूटमध्ये लोह आणि फोलेट असते, जे ॲनिमियामुळे होणारी केसगळती रोखण्यास मदत करतात. तसेच केस मजबूत होतात.

Reduces Hair Loss | pinterest

कोंडा राहतो नियंत्रित

बीटरूटमधील बुरशी-विरोधी गुणधर्म टाळूला आराम देतात आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे बीटरूटचा तुमच्या डाएटमध्ये नक्की समावेश करा.

Dandruff Under Control | pinterest

केस अकाली पांढरे होत नाही

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि कॅरोटीन सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत.

Prevents Premature Graying | pinterest

हेअर कलर

एका बाऊलमध्ये बीट चिरून घ्या. त्यानंतर ब्लेंडरमध्ये वाटून त्याचा रस काढा. त्याची पेस्ट बनवण्यासाठी त्यात २ चमचे खोबरेल तेल मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या केसांना विशेषतः ज्या भागांवर तुम्हाला रंग हवा आहे, त्या भागांवर व्यवस्थित लावा.

Hair Colour Application | pinterest

केस धुवा

तुमचे केस शॉवर कॅपने झाका. रंग केसांमध्ये मुरण्यासाठी १ ते २ तास लागतात. त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा. लगेच शॅम्पू करू नक. रंग टिकून राहावा यासाठी किमान २४ तासांनंतर शॅम्पू करा.

Washing Your Hair | pinterest

बीटरूटचा रंग

बीटरूट केसांना हलकी लाल किंवा बरगंडी रंगाची छटा देते, जी उन्हात अधिक उठून दिसते. तुमचे केस अधिक चमकदार होतील.

Beetroot | pinterest

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

disclaimer | pinterest

NEXT : केस धुवताना 'ही' चूक टाळा, अन्यथा पडेल टक्कल

Summer Hair Care | pinterest
येथे क्लिक करा...