Manasvi Choudhary
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढणयासाठी आहारात फळांचा समावेश केला जातो. आंबा आणि केळी ही दोन्ही फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबा या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर ही पोषणतत्वे असतात.
१) आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
२) आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
३) फायबर मुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
४) आंबा त्वचा आणि केसांसाठी फायदा होतो.
५) व्हिटॅमिन ए, सी आणि अॅटिऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होते आणि केसांचे सौंदर्य सुधारते.
६) आंबा जास्त खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण पटकन वाढते. त्यामुळे मधुमेही लोकांनी याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
१) केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
२) केळी थंड असल्याने पावसाळ्यात सर्दी- खोकला होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.